कोरोनाचे संकट किती मोठे होणार आहे याची कल्पना नाही! नितीन गडकरी

Share This News

देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. गेले 2 दिवस देशात 2 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या या संकटाबाबत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीही चिंता व्यक्त केली आहे. हे संकट किती मोठे होणार आहे आणि हे संकट किती काळ चालणार आहे याची काही खात्री देता येत नाही असे गडकरी यांनी म्हटले आहे. नागपूरमधील राष्ट्रीय कॅन्सर केंद्रामध्ये 100 खाटांचे कोरोना देखभाल केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे गुरुवारी गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांनी ही भीती बोलून दाखवली.

गडकरी यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले की घरेच्या घरे कोरोनाबाधित होत आहेत. पुढच्या 15 दिवसांत किंवा महिनाभरात काय होईल, याबाबत काहीही सांगणं कठीण असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. सगळं चांगलं होईल अशी अपेक्षा करतानाच वाईट परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी सज्ज राहणे हे योग्य ठरेल असे गडकरी यांनी म्हटले आहे. यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. कोरोनाविरूद्ध लढा देत असताना तात्पुत्या उपाययोजनाऐवजी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देणं गरजेचं असल्याचं गडकरी यांचे म्हणणे आहे.

निवडणूक असलेल्या राज्यांत 500 टक्के रुग्णवाढ

विधानसभा निवडणूक लागलेल्या पाच राज्यांतील कोरोना विस्फोटचा धोका अखेर खरा ठरला. दीड महिना चाललेल्या निवडणुकीमुळे पश्चिम बंगाल, आसाममध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत 500 टक्क्यांची वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर मृत्यूचे प्रमाणही सरासरी 45 टक्क्यांनी वाढले आहे.

पाच राज्यांतील 1 ते 14 एप्रिलपर्यंतच्या रुग्णवाढीने संपूर्ण देशाला धडकी भरवली आहे. 16 ते 31 मार्चपर्यंत आसाममध्ये 537, पश्चिम बंगालमध्ये 8062, पुद्दुचेरीत 1400, तामीळनाडूत 25,244 व केरळमध्ये 30,390 कोरोनाग्रस्त आढळले होते. मात्र गेल्या 14 दिवसांत आसाम-3398, पश्चिम बंगाल- 41927, पुद्दुचेरी- 3721, तामीळनाडू- 65458 अशी विक्रमी रुग्णवाढ झाली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.