रात्री पाचपेक्षा जास्त लोकांना आता एकत्र येता येणार नाही
नागपूर |
राज्य शासनाने मनपा क्षेत्रात संचारबंदीची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन नसून कफ्यरू आहे. त्यानुसार रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येता येणार नाही. नागपूर महापालिकेला यासंदर्भात लेखी स्वरूपात माहिती यायची आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर मंगळवारपासून राज्यात हा नियम लागू असणार आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे स्वरूप बघायला मिळाले आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची लाट आल्याने दुसर्यांदा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात या लाटेचा कुठलाही शिरकाव होऊ नये, या दृष्टीने राज्य सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत कफ्यरू अर्थात कलम १४0 लागू करण्यात आली आहे. मंगळवारपासून (ता.२२ डिसेंबर) हा नियम लागू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. कोरोनासंदर्भात महाराष्ट्र हे बाधित आणि कोरोना मृत्यूच्या संख्येत पुढे होते. या बाबींची दखल घेत कोरोनाच्या दुसर्या लाटेची दखल राज्य शासनाकडून घेण्यात आली. याकरिता राज्य शासनाकडूनकाही आवश्यक निर्णयदेखील घेण्यात आले. दरम्यान, अद्यापही राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली नाही. मात्र, आंतराष्ट्रीय स्तरावरून येणार्या वार्ता या कोरोनापासून सतर्क राहण्याचा इशारा देणार्या आहेत. ब्रिटेनमध्ये कोरोनाचा नवीनच प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे, काळजी आणि सतर्कता लक्षात घेत राज्य शासनाकडून सुरक्षात्मक निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, अनलॉकमध्ये तसेही १0 वाजेच्यानंतर कुठल्याही प्रकारची प्रतिष्ठाने उघडी ठेवण्यास मनाई आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहे. पुढे ख्रिसमस आणि ३१ फस्ट आहे. या दिवशी उशिरा रात्रीपर्यंत जल्लोष साजरा करण्यात येतो. याबाबतची दखलदेखील राज्य शासनाकडून घेण्यात आली आहे. अनलॉकमध्ये १0 पर्यंतची वेळ राज्य शासनाकडून कायम ठेवण्यात आली असून, रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत कफ्यरू लावण्यात आला आहे. |