राज्यातील कुठल्याही महापालिका, नगरपालिकांना विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – एकनाथ शिंदे No Municipal Corporation will be allowed to run out of funds for development works – Eknath Shinde

Share This News

 मुंबई: मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत राज्यातील कुठल्याही महानगरपालिका व नगरपालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा योजनेअंतर्गत निधी अप्राप्त असल्याबाबत विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते विधान परिष  कोविड -19 च्या संकटामुळे राज्यात लॉकडाऊन  करण्यात आला होता तसेच राज्याच्या उत्पन्नावरही मर्यादा आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर प्राधान्यक्रमाने विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. नागपूर महानगरपालिकेत कुठलीही विकासकामे थांबविण्यासाठी नगरविकास विभागाने आदेश दिलेला नाही. ज्या कामांची कार्यादेश निघाले आहेत ती कामे थांबणार नाहीत आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी माहिती मंत्री श्री.कोकणातील ज्या नगरपालिकांची स्थिती बेताची आहे, त्यांना मूलभूत सोयी – सुविधांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी  एका झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सदस्य डॉ. परिणय फुके यांनी सहभाग घेतला.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.