नागपुरातील सोनेगावात कुख्यात गुंडाची हत्या | Notorious goon killed in Sonegaon, Nagpur

Share This News

नागपूर : चार ते पाच युवकांच्या एका टोळीने कुख्यात गुंडाची सोनेगावात हत्या केली. या घटनेमुळे सोनेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवार, २२ फेब्रुवारीला सायंकाळी ही घटना घडली. घटनेनंतर भेंडे ले-आऊट परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
सोनेगाव परिसरात झालेल्या या हत्याकांडामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नीलेश राजेश नायडू (वय ३१, रा.खामला) हे हत्या करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. प्रतिक सहारे नामक युवक यात जखमी झाला आहे. नीलेशविरूद्ध लुटपाट, हत्या, हत्येचा प्रयत्न, चोरी आदींसह अनेक गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करून त्याला कारागृहात डांबले होते. शुक्रवारी तो जामिनावर बाहेर आला होता. तो सोनेगाव परिसरात आला असता चार ते पाच युवकांच्या टोळीने त्याच्यावर हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोर पसार झालेत. सोनेगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.