रेमडेसिव्हीरसाठी आता जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष

Share This News

मुंबई : राज्यात कोरोना लस, रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता जिल्हा स्तरावरच कंट्रोल रुमची उभारणी केली जाणार आहे.
खासगी दुकानदार अव्वाच्या सव्वा किमतीने इंजेक्शन विकत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. आता ऑक्सिजन कंट्रोल रुममध्ये रेमडेसिव्हीरबाबत तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. या तक्रारीचं निवारण स्थानिक अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयामार्फत केलं जाईल. राज्यात सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी इंजेक्शन निर्मिती कंपन्यांशी नुकतीच बैठक घेतली. त्यात रेमडेसिव्हीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक आणि काळा बाजार होऊ नये म्हणून इंजेक्शनवरील छापील किंमत कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.