आता डिजिटल मतदार ओळख पत्र मिळणार

Share This News

नवी दिल्ली
देशात २५ जानेवारी रोजी मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी निवडणूक आयोग देशात डिजिटल मतदार ओळखपत्र जारी केले जाणार आहे. मतदार ओळखपत्र आधार कार्डप्रमाणे डाउनलोड करू शकतो. निवडणूक आयोगाकडून सोमवारी इलेक्ट्रॉनिक इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी अँप (ई-इपिक) लाँच केले जाईल.
ई-इपिकच्या वापरासाठी खास प्रक्रिया आणि काही नियमांचे पालन करावे लागेल. डिजिटल मतदार ओळख पत्रासाठी मतदाराला आपल्या संपूर्ण माहितीची पडताळणी करावी लागेल. मतदाराच्या मोबाईल नंबरसह, त्याचा ईमेल आयडीही देणे अनिवार्य आहे. प्रक्रियेअंतर्गत मतदाराचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये नोंदवल्यानंतर, त्याला एका अँपद्वारे मेल आणि फोनवर मेसेज मिळेल. यात सुरक्षेच्या दृष्टीने पासवर्ड आणि ओटीपीची सुविधाही असणार आहे. दोन क्यूआर कोडही असणार आहेत. यात वोटर्सची संपूर्ण माहिती आणि त्याच्या भागाची माहिती असणार आहे. निवडणूक आयोगाने वोटर आयडी कार्डच्या हार्ड कॉपीचाही पर्याय ठेवला आहे. त्यासाठी २५ रुपये शुल्क भरावे लागेल.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.