नागपुरात नर्सला बेशुद्ध करीत केला बलात्कार Nurse raped while unconscious in Nagpur

Share This News

नागपूर : एका नर्सला बेशुद्ध करीत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना नागपुरात घडली. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. अमरदिप कृष्णाजी मंडपे हे आरोपीचे नाव आहे.


अमरादिप हा शहरातील एका हॉस्पीटलमध्ये काम करतो. त्याने त्याच्याचा हॉस्पीटलमध्ये काम करणाऱ्या नर्सचे आक्षेपार्ह परिस्थिती व्हिडीओ काढले. त्यानंतर व्हिडीओ व्हारयल करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर हॉस्पीटमध्येच बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमरदिप हा विवाहित आहे. त्याला दोन अपत्येही आहेत. अमरदिपसोबत हॉस्पीटलमध्ये काम करणाऱ्या नर्सचा पती एका खासगी कंपनीत काम करतो. तो नागपूरबाहेर असतो. अशात अमरदिपने गेल्यावर्षी नर्सला हॉस्पीटमध्ये बेशुद्धीचे औषध दिले. त्यानंतर त्याने तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढले. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तिला दिली व हॉस्पीटलमध्येच तिच्यावर बलात्कार केला. याप्रकाराला कंटाळत नर्सने बजाजनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.