भंडाराप्रकरणात नर्सेसचा बळी; मेंढे, बावनकुळे यांचा आरोप

Share This News

नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागेलल्या आगीप्रकरणी गुन्हहा दाखल करण्यात आलेल्या दोन्ही नर्सेस या कंत्राटी आहेत. रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सकांसह इतर खऱ्या दोषींना वाचविण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांना बळी देण्यात आल्याचा आरोप खासदार सुनील मेंढे व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेबी केअर युनीटला लागलेल्या आगीम दहा बाळांचा कोळसा झाला होता. याप्रकरणाची पारदर्शक चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र खऱ्या दोषींना वाचविण्यासाठी कंत्राटी नर्सेसविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे दोन्ही नेते म्हणाले. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन नर्सपैकी एकीने नाव उघड न करण्याच्या अटीवर शुक्रवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. जिल्हा सामान्य रुग्णालयात ज्याप्रकारे नर्सेसची नियुक्ती व्हायला पाहिजे होती, त्या पद्धतीने व तितक्या संख्येने नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. रुग्णालयातील सोयी-सुविधा, फायर ऑडिट आदी बाबींची जबाबदारी नर्सेसची नाही. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी आम्हाला गुन्हेगार करण्यात आल्याचे या नर्सने विविध प्रसार माध्यमांना दिलेल्या व्हिडीओ मुलाखतीत नमूद केले. भंडाऱ्यातील अग्निकांडाची योग्य चौकशी झालेली नाही. वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय व्यक्ती अजूनही मोकळे फिरत आहेत. त्यामुळे या प्रकाराशी संबंधित प्रत्येक व्यक्तीवर मग तो नर्स असो की मंत्री त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा मृत बाळांच्या पीडित कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.