काचीपुरा चौकात कार्यरत पोलीसांना नूतन रेवतकर यांच्या तर्फे फेस शील्डचे वाटप

Share This News

कोरोनाच्या या संकट काळातही स्वतःच्या जीवाची कुठलीही पर्वा न करता नागरिकांसाठी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी यांना त्यांच्या कर्तव्यकाळात फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करीत असतांना सुरक्षित राहणे अतिशय महत्वाचे आहे जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सुरळीत सुरू राहू शकते. या उद्देशाने पोलीस बंधू यांना फेस शील्डचे वाटप नागपूर शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माजी महिला अध्यक्ष व वरिष्ठ उपाध्यक्षा नूतन रेवतकर यांच्या तर्फे करण्यात आले. बजाज नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश चव्हाण यांचे उपस्थितीत काचीपूरा चौक येथे कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचारी यांना फेस शील्डचे वाटप करण्यात आले


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.