शीख समुदाय विरुद्ध आक्षेपार्ह मजकूर
विरोधकांकडून गालबोट लावला जात असल्याचा आरोप या ग्रुपचे ॲडमिन माजी नगरसेवक बलराम दोडानी तसेच अरविंद सोनी, हरकिषण मल्लांन, बजसिंग आणि प्रदीप या व्यक्तींनी आक्षेपार्थ मजकूर टाकला. शीख समुदाय हा पाकिस्तानला मदत करीत असून पाकिस्तानच्या निर्मितीसाठी शिख आणि शेतकरी समुदाय दिल्ली सीमेवर असल्याचा आरोप ग्रुप वर टाकण्यात आला होता. समाज माध्यमावरील या पोस्टमुळे शीख समुदायात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून शहरातील पाच ही गुरुद्वारा प्रमुख यांनी एकत्र बैठक घेऊन रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. विशिष्ट धर्माचा धार्मिक भावना दुखावणे, त्यानुसार जसबीर सिंग, भगतसिंग सैनी, यांचा तक्रारीअनुसार आणि प्रदीप या दोघांविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला असून हरकिषण मल्लांन याला अटक करण्यात आलेली आहे. व यांचावर कलम ५०५ (२) आय.पी.सी. अंतर्गत तपास चालू आहे. हरकिषण मल्लांन यांचाकडून मोबाइल जप्त केला असून यांचा कडून मोबाईल डाटा (रीकवर) केलेले आहे. तसेच पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की दोन धर्मामध्ये तेड निर्माण होणार नाही, असे कोणीहि पोस्ट टाकू नये, व या पोस्टला लाइक करू नये. आणि असे केल्यास वरील कलमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.