हायकोर्टाच्या महिला जजबद्दल आक्षेपार्ह व्हिडीओ

Share This News

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कार्यरत एका महिला न्यायमूर्तींच्या विरोधात एका महिलेने यू-ट्युबरवर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केला आहे. या घटनेमुळे विधी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उच्च न्यायालयात कार्यरत अनेक विधिज्ञ या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे संतप्त झाले आहेत. यासंदर्भात वरिष्ठ न्यायमूर्तींशी चर्चा केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा व्हिडीओ तयार करणाऱ्या महिलेने संबंधित न्यायमूर्तींच्या काही निर्णयांवर आक्षेप घेतला आहे. या न्यायमूर्तींच्या नावासह या महिलेने सोशल माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल केला आहे. काही वेळातच हा व्हिडीओ यू-ट्युबवरून व्हॉट्सअॅप आदी सोशल माध्यमांवर पोहोचला. त्यामुळे खळबळ उडाली. व्हिडीओ तयार करणाऱ्या महिलेवर त्यामुळे न्यायालय कारवाई करू शकते, अशी शक्यता विधी वर्तुळातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.