निधीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांनी सरकारला धरले धारेवर | On the issue of funding, the Mungantiwars took the government by storm

Share This News

मुंबई : विदर्भ, मराठवाड्यातील वैधानिक विकास मंडळावरील नियुक्त्या रखडल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून विदर्भ, मराठवाड्यातील निधी पश्चिम महाराष्ट्रात पळविण्याचा सपाटा पुन्हा सुरू झाल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवार, १ मार्चला विधानसभेत केला.
विदर्भ आणि मराठवाड्यातील वैधानिक विकास मंडळांवरील नियुक्त्या का रोखण्यात आल्या, असा जाब त्यांनी सरकारला विचारला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून विदर्भ आणि मराठवाड्याचे किती कोटींनी नुकसान झाले, याचा गोषवाराच मुनगंटीवार यांनी मांडला. राज्यात भाजपचे सरकार असताना विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राला समतोल निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडी सरकार पुन्हा विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय करीत असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली.
मुनगंटीवार यांच्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय झालेला नाही व होऊ देणार नाही असे स्पष्ट केले. राज्यातील सर्व विभागांना, प्रदेशांना समान निधी वाटप करण्याचा प्रयत्न आहे. परंतु कोरोनामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे निधीच्या बाबतीत थोडे बदल झाले असतील. मात्र निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.