शहीद दिनाच्या निमित्ताने देशवासियांचे भगतसिंहांना नमन; जाणून घ्या का साजरा केला जातोय शहीद दिन

Share This News

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक शूर विरांनी देशासाठी बलिदान दिलं होतं. हसतमुखाने आपले जीवन अर्पण करणाऱ्या वीरांच्या आठवणी दरवर्षी जाण्या होतात. दरवर्षी 23 मार्च हा शहीद दिवस (Shaheed Diwas) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी 23 मार्च 1931 ला क्रांतिवीर सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती. त्यामुळे हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी या तिघांनी प्राणाची बाजी लावली. भारतात प्रामुख्याने दोन वेळा शहीद दिवस साजरे केले जातात.दरवर्षी 23 मार्च आणि 30 जानेवारी रोजी शहीद दिवस साजरा केला जातो. देशासाठी हुतात्मा झालेल्या शुरविरांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. 23 मार्च आणि 30 जानेवारी हे दोन्ही दिवस भारताच्या इतिहासासाठी महत्त्वाचे दिवस आहेत. 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली होती. तसेच 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. त्यामुळे या तीन क्रांतिवीरांच्या स्मरणार्थ 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.

भारतात 23 मार्चच्या दिवशी शहीद दिवस साजरा करतात. या दिवशी 23 मार्च 1931 ला क्रांतिवीर सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती .म्हणून हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी हे तिघे जण हसत हसत मृत्यूला सामोरी गेले. शहीद झाले त्यावेळी त्यांचे वय फार लहान होतें. भगतसिंग आणि सुखदेव अवघे 23 वर्षाचे आणि राजगुरू हे अवघे 22 वर्षाचे होतें. त्यांनी आपल्या देशासाठी आपले सर्वस्वपणाला लावले आणि देशाला ब्रिटिशांच्या दासत्वा पासून स्वतंत्र केले.शहीद दिवस प्रामुख्याने भारतात दोन वेळा साजरे केले जाते. दरवर्षी 23 मार्च रोजी आणि 30 जानेवारी रोजी . शहीद दिवस देशासाठी हुतात्मा झालेल्या शहीद लोकांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात. 23 मार्च आणि 30 जानेवारी हे दोन्ही दिवस भारतासाठी स्वतंत्रतेच्या संघर्षाच्या इतिहासासाठी महत्त्वाचा आहे.30 जानेवारी1948 ला नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली होती. आणि 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू,सुखदेव यांना फाशावर देण्यात आले होतें.

या दिवशी राजघाट वर पंतप्रधान, राष्ट्रपतीआणि इतर गणमान्य नेता हुतात्मांना आपली श्रद्धांजली वाहतात.देशात हुतात्मांचे चित्र लावून हार आणि ध्वजारोहण करून शहीद दिवस साजरा करतात. भाषण आणि निबंध स्पर्धा घेण्यात येतात. सैन्य दलाचे जवान देखील शहीदांना आदरांजली देतात. शाळा शैक्षणिक संस्था,आणि सामाजिक क्लब मध्ये शहीदांनी दिलेल्या योगदाना बद्दल बैठका आणि भाषण आयोजित केले जातात.
शहीद दिवस आठवण करून देतो की आपल्या पिढीला गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावे या साठी किती हुतात्मांनी आपले प्राण दिले.
हुतात्मा दिन स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची संधी देतो . हा एक सोहळा आहे जो देशवासीयांना त्यांची जात, धर्म
विचारात न घेता एका सूत्रात बांधून ठेवतो.हा दिवस भारताच्या इतिहासात काळा दिवस म्हणूनही ओळखला जातो
कारण या दिवशी अनेक नामवंत स्वातंत्र्य सैनिकांनी आपला जीव गमावला.शहीद दिन भारताच्या तरुण पिढीसाठी प्रेरणा स्त्रोत म्हणून आहे.
आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी भारतात शहीद दिवस
साजरा केला जातो. शहीद दिवस हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील सर्वात वाईट दिवस आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.