राष्ट्ररक्षा,आय एन एस कलवरी आणि खांदेरीच्या निमित्ताने…

Share This News

जगावर राज्य करायचं असेल तर समुद्रावर आपली सत्ता हवी..! असं भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाविक धोरण होतं. भारतीय नौदलही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि धोरण पुढे नेण्याचा प्रयत्नं करत आहे. कारण समुद्रावर सत्ता गाजवायची असेल तर समुद्राच्या पाण्यावर आणि समुद्राच्या पोटातही युद्ध लढण्याचं सामर्थ्य हवं. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाणबुडीचा ताफा पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्नं सध्या मोदी सरकार आणि भारतीय नौदल करत आहे..

प्रकल्प 75 अंतर्गत भारतीय नौदल फ्रान्सच्या तंत्रज्ञांनी विकसीत केलेल्या स्कॉर्पियन पाणबुडींचं संपूर्णपणे भारतीयकरण करून स्वबळावर 6 पाणबुडी बांधत आहे. त्यापैकी INS कलवरी आणि INS खांदेरी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाल्यात. आता याच वर्गातील तिसरी पाणबुडी ‘INS करंज’ भारतीय नौदलात कर्तव्य बजावण्यास सज्ज झाली आहे. INS करंज पाणबुडीचं सर्वात मोठं वैशिष्ट म्हणजे समुद्राच्या पोटात असताना कोणताही आवाज न करता, क्षत्रू देशांच्या युद्धनौका आणि पाणबुडींच्या रडार यंत्रणांना चकवा देऊन मोहीम फत्ते करण्याची क्षमता या पाणबुडीत आहे.

युद्धजन्य काळात क्षत्रू देशांच्या नाविक तळांवरील सुक्ष्म हालचालींची माहिती अचूकपणे टिपण्यास INS करंज महत्वाची भूमिका निभावणार आहे. समुद्राच्या पाण्याखाली सलग 45 दिवस रहाण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे. ही पाणबुडी समुद्रातील 300 किलोमीटर परीघातील युद्धनौका नष्ट करु शकते. INS करंज एका तासात 35 नॉटीकल मैल वेगाने प्रवास करू शकते. INS करंज पाणबुडी 67 मीटर लांब, 6.2 मीटर रुंद, आणि 12.3 मीटर उंच आहे, वजन 1550 टन आहे आणि खोल समुद्रात 350 मीटर खोली पर्यंत जाऊ शकते. INS करंज पाणबुडी समुद्रात एकदा उतरल्या नंतर सलग 12 हजार किलोमीटरचा प्रवास करू शकते! १० मार्च २०२१ रोजी INS करंज कमिशन होणार आहे…

  • अरविंद सावंत

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.