गुरुवारी १५ प्रतिष्ठानांवर आणि २५ नागरिकांविरुद्ध उपद्रव शोध पथकाची कारवाई  

Share This News

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी  १५ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन किमान . १,४५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५९ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.  तर मनपाच्या  उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३७५०३ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,७१,१०,५००/- चा दंड वसूल केला आहे.  मनपा उपद्रव शोध पथक व रेल्वे पोलिस बल यांनी संयुक्तपणे रेल्वे स्थानकावर मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई सुरु केली. दररोज ही कारवाई केली जात आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली असून कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे.  मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली आहे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.