अमेरिकेत तब्बल दीड लाख कॅमेरे केले हॅक; कंपनी, रुग्णालयाचा उडवला डेटा One and a half million cameras hacked in US; The company, the hospital’s blown data

Share This News

वॉशिंग्टन – अमेरिकेत हॅकर्सने मोठा अटॅक केला आहे. हॅकर्सच्या एका ग्रुपने सिलिकॉन व्हॅलीमध्ये असलेल्या स्टार्टअप वेरकाडाच्या सुरक्षा कॅमेऱ्याचा डेटा हॅक केला असल्याची घटना आता समोर आली आहे. या हॅकिंगमुळे रुग्णालये, कंपन्या, पोलीस विभाग, तुरुंग आमि शाळांमध्ये लावण्यात आलेले दीड लाखांहून अधिक सिक्युरीटी कॅमेऱ्याची लाइव्ह फिड हॅकर्सने मिळवली. टेस्ला, क्लाउड फ्लेयर आदी कंपन्यांच्या डेटा हॅक करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत हॅकिंगमुळे खळबळ उडाली आहे. हॅकर्सने महिला रुग्णातील आतील दृष्येही हॅक केली आहेत. यातील अनेक कॅमेरे हे चेहऱ्यावरून व्यक्तीची ओळख पटवण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यांचाही डेटा हॅकर्सच्या हाती लागला आहे. वेरकाडा कंपनीच्या सगळ्या ग्राहकांचे व्हिडिओ अर्काइव्हदेखील हाती लागले असल्याचा दावा हॅकर्सने केला आहे. टेस्लाच्या व्हिडिओत शांघाईतील एक कर्मचारी असेंब्ली लाइनवर काम करत असल्याचे दिसत होते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.