भंडाऱ्यात वऱ्हाड्यांच्या बसला अपघात, एक ठार

Share This News

भंडारा : विवाह सोहळा आटोपून वऱ्हाड्यांना परत घेऊन जाणारी खासगी बस अनियंत्रित झाल्यानेमंदिराला आदळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर ३४ वऱ्हाडी जखमी झालेत. त्यातील सहा जण गंभीर असून त्यांच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास भंडारा-साकोली राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव सडक येथे घडली.
रविवारी सायंकाळी बालाघाट जिल्ह्यात आयोजित विवाह समारंभासाठी नागपूर येथील वऱ्हाडी खासगी बसने गेले होते. समारंभ आटोपल्यानंतर रात्रीच्या सुमारास वऱ्हाड्यांना घेऊन बस परत नागपूरला येत होती. रात्री अकराच्या सुमारास साकोलीच्या पुढे राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव सडकजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या हनुमान मंदिराला धडकली. या अपघातात बसचालकाच्या शेजारी बसलेले प्रशांत गायकवाड (वय ६०) हे घटनास्थळीच ठार झाले. सुरेश गायकवाड (वय ४९), अरुण मेंढे (वय ५९), राजन लांजेवार (वय ४१), प्रवीण गायकवाड (वय ४५), अजय जीवने (वय ४३), वंशिका निकोसे (वय १५) हे गंभीर जखमी झालेत. त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.