अकोल्यात शेतशिवारामध्ये एकाची निर्घृण हत्या

Share This News

अकोला, 13 एप्रिल : बोरगांव मंजु पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जवळा खुर्द शेतशिवारामध्ये पद्माबाई रामभाऊ राऊत यांचे शेतामध्ये मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या टाकळी पोटे येथील विठ्ठल नथ्थुजी ठाकरे वय अं. ४५ यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना१३ रोजी सकाळी उघडकीस आली. गोविंदा नथ्थुजी ठाकरे (वय ५५) यांनी योगेश हरिभाऊ जळमकार रा. टाकळी पोटे याने मृतक विठ्ठल नथ्थुजी ठाकरे यांची निर्गुण हत्या केल्याची तक्रार बोरगाव मंजू पोलिस स्टेशनला केली आहे.सविस्तर वृत्त असे की, टाकळी पोटे येथील योगेश हरिभाऊ जळमकार व मृतक विठ्ठल नथ्थुजी ठाकरे यांच्यामध्ये काही वैयक्तिक जुने वाद होते. अशातच दि.१२ सोमवार रोजी रात्री ९ च्या दरम्यान काही कारणास्तव पुन्हा किरकोळ वाद झाला होता व तो वाद गावकऱ्यांच्या मध्यस्थीने आपसात करण्यात आला होता. मृतक विठ्ठल नथ्थुजी ठाकरे हे पद्माबाई रामभाऊ राऊत यांच्या नफा – बटाइने केलेल्या जवळा खुर्द शिवारातील शेतामध्ये भुईमुग व कडाऊ या पिकाची रात्री ११ च्या दरम्यान रखवाली करिता गेले होते. आज दि.१३ मंगळवार रोजी मृतक विठ्ठल नथ्थुजी ठाकरे हे सकाळी घरी परत न आल्यामुळे त्यांचा पुतण्या दत्ता गोविंद ठाकरे हा काका घरी परत न आल्यामुळे शेतामध्ये पाहायला गेला असता त्याला विठ्ठल नथ्थुजी ठाकरे हे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आल्याचे त्याने वडील गोविंद नथ्थुजी ठाकरे यांना माहीती दिली.बोरगाव मंजू पोलिस स्टेशनला गोविंद नथ्थुजी ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून घटनास्थळी एस. डी. पी. ओ. संतोष राऊत ,बोरगाव मंजू पोलिस स्टेशन चे ठाणेदार सुनील सोळंके, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण,बीट जमादार सतिष सपकाळ, नामदेव केंद्रे,मंगेश इंगळे,तुषार मोरे, फइम भाई तसेच पिंजर पोलिस स्टेशन चे ठाणेदार महादेव पडघान,बीट जमादार महादेव साळुंके सह आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणी करीता सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आला. बोरगाव मंजू पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके यांचे मार्गदर्शनानुसार आरोपी चे लोकेशन घेऊन L c B पथकं बोलावून आरोपी हा नातेवाईक च्या घरी फरार होत असतांना पथकाने सापळा रचून आरोपी योगेश हरीभाऊ जळमकर यांना तात्काळ अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सुनीलजी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण,बीट जमादार सतिष सपकाळ, नामदेव केंद्रे हे करीत आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.