नागपुरात केमिकल इंजिनीअरचा ऑनलाइन देहव्यापार

Share This News

नागपूर : एका केमिकल इंजिनीअर तरुणाने सुरू केलेल्या ऑनलाइन देहव्यापाऱ्याचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कोलकोत्याच्या दोन व पाटण्यातील एका तरुणीची सुटका करण्यात आली आहे. देवेंद्र ऊर्फ कुणाल हरीशंकर पटेल (वय २८, रा. होशंगाबाद, मध्य प्रदेश) हे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे.
नागपुरात सुरू असलेल्या या ऑनलाइन देहव्यापाराचा सूत्रधार रेहान व राज आहे. रेहानविरुद्ध यापूर्वीही चार गुन्हे दाखल आहेत. देवेंद्र बुटीबोरीतील एका कंपनीत कामाला होता. लॉकडाउनमुळे त्याची नोकरी गेली. त्यानंतर तो रेहान व राजच्या संपर्कात आला. दोघांच्या मदतीने देवेंद्रने ऑनलाइन देहव्यापाऱ्याला सुरुवात केली. याबाबत गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी यांना माहिती मिळाली. फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सार्थक नेहते, महिला पोलिस उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, मंगला हरडे, हेडकॉन्स्टेबल अनिल अंबाडे, भूषण झाडे, रिना जाऊरकर, सुजाता पाटील यांनी सापळा रचला. पोलिसांनी देवेंद्रशी संपर्क साधत तीन तरुणींची मागणी केली. ४२ हजारांत सौदा पक्का झाला. पोलिसांनी गुगल पेद्वारे त्याच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले. त्याने वर्धा मार्गावरील मिडास ओयो हॉटेलमध्ये बोलाविले. पोलिसांनी सापळा रचून देवेंद्रला अटक केली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.