भंडारा : केवळ 25 टक्के पीक विम्याचा लाभ

Share This News

यंदाच्या खरिपात तालुक्यातील २६ हजार २६५ शेतक-यांनी जवळपास १३ हजार ६०० हे. क्षेत्रातील धान पिकासाठी पिक विमा काढल्याची माहिती आहे. दरम्यान यंदाच्या खरिपात पुरपरिस्थितिमूळे तालुक्यात ८ हजार ७५३ हे. क्षेत्रातील पिकांचे नुकसान होतांना ४२ शेतकऱ्यांच्या धान पिकाची परतीच्या पावसाने नुकसान झाल्याची माहिती आहे. यासबंध परिस्थितीत विमा कंपनीने नुकसानीचे प्रमाणात २५ टक्के विमा लागू केल्याने शेतक-यांची घोर निराशा झाल्याचे बोलले जात आहे.

लाखांदूर : यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात निर्माण झालेली पुरपरिस्थीती व तुडतुडा किडरोगासह परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाले. मात्र विमा कंपनीने ‘मिड सीज़न अडव्हरसिटी’ लागू करीत नुकसानीचे प्रमाणात २५ टक्के पिक विम्याचा लाभ दिला जात असल्याने क्षतीग्रस्त शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे बोलले जात आहे. माहिती नुसार , यंदाच्या खरिपात लाखांदूर तालुक्यातील भागडी, लाखांदूर व विरली(बू) या तीन मंडळांतर्गत पुरपरिस्थीती तुडतुडा व परतीच्या पावसाने जवळपास ८ हजार ७५३ हेक्टर क्षेत्रातील पिक हानी झाली होती. सदर हानीची दखल घेत शासनाने नुकसानग्रास्त भागाची पाहणी व पंचनामे करुन ५० टक्के पेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला. मात्र विमा कंपनीने ‘मिड सीज़न अडव्हरसीटी’ च्या नियमानुसार हंगामाच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अपेक्षीत उत्पादनामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त घट असेल तर नुकसान भरपाइच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यात येते. त्यानुसार यंदाच्या खरिपात तालुक्यातील २६ हजार २६५ शेतक-यांनी जवळपास १३ हजार ६०० हे. क्षेत्रातील धान पिकासाठी पिक विमा काढल्याची माहिती आहे. दरम्यान यंदाच्या खरिपात पुरपरिस्थितिमूळे तालुक्यात ८ हजार ७५३ हे. क्षेत्रातील पिकांचे नुकसान होतांना ४२ शेतकऱ्यांच्या धान पिकाची परतीच्या पावसाने नुकसान झाल्याची माहिती आहे. यासबंध परिस्थितीत विमा कंपनीने नुकसानीचे प्रमाणात २५ टक्के विमा लागू केल्याने शेतक-यांची घोर निराशा झाल्याचे बोलले जात आहे. तथापि शेतकऱ्यांनी शासनाच्या प्रधानमंत्री पिक योजनेंतर्गत विम्याचा लाभ उत्पादन क्षेत्राच्या प्रमाणात विम्याचा लाभ दिला जाणार या गैरसमजाने विमा काढल्याची चर्चा आहे. मात्र विमा कंपनीने उन्बरठा उत्पादन व अपेक्षीत उत्पादनाच्या नुकसानिच्या २५ टक्के प्रमाणात विमा रकमेचे वाटप सुरु केल्याने शेतकऱ्यात नाराजी दिसून येत आहे. दरम्यान, तालुक्यातील अनेक विमाधारक शेतक-यांना हेक्टरी ७०० ते ७५० रु. विम्याची आगाऊ रक्कम उपलब्ध केली जात असल्याने निर्धारित विमा रकमेच्या एक तृत्यांश रक्कम असल्याचा आरोप शेतक-यांत केला जात आहे. याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेवुन ‘मिड सीज़न अडव्हरसीटी‘ च्या नावाखाली विमा कंपनी कडून शेतक-यांची झालेली घोर निराशा दुर करन्याहेतू आवश्यक उपाययोजना व कार्यवाही करण्याची मागणी शेतकरी जनतेत केली जात आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.