केवळ 69 हजार डाऊन पेमेंट, Volkswagen Polo तुमच्या घरात, EMI किती?

Share This News

मुंबई : कारचा लूक आणि फीलमुळे तिला वाढती मागणी आहे. पोलो जवळपास एक दशकापासून हॅचबॅक सेगमेंटमध्ये (volkswagen polo hatchback) आपली पकड बनवून आहे. कंपनी लवकरच नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे.

जर तुम्ही ही कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. केवळ 69 हजार रुपयांच्या डाऊनपेमेंटमध्ये या कारचं बेसिक मॉडेल (1.0 MPI Trendline Petrol) घरी घेऊन जाऊ शकता. त्यासाठी पाच वर्षांच्या मुदतीच्या कर्जाची तरतूद आहे.

या कारची किंमत 6.1 लाख रुपये (ऑन रोड किंमत नवी दिल्ली) आहे. जर तुम्ही 69 हजार रुपये डाऊन पेमेंट केलं, तर 6 लाख 25 हजार 701 रुपयांचं लोन घ्यावं लागेल. यावर 9.8 टक्के व्याजदर लागू होईल. यानुसार पाच वर्षात तुम्हाला 7 लाख 93 हजार 980 रुपये बँकेला अदा करावे लागतील. यामध्ये 1 लाख 68 हजार 279 रुपये केवळ व्याज असेल. यानुसार दर महिन्याचा हप्ता 13 हजार 233 रुपये इतका असेल.

जर तुम्हाला EMI चा भार थोडा कमी करायचा असेल, तर तुम्हाला कर्जाची मुदत वाढवून घ्यावी लागेल. जर सात वर्षांसाठी कर्ज घेतलं तर या कर्जाची रक्कम 6 लाख 25 हजार 701 रुपये असेल. ती सात वर्षात भागवावी लागेल. यावरही 9.8 टक्के व्याजदर लागू होईल.

सात वर्षात व्याजासह 8 लाख 67 हजार 132 रुपयांचा परतावा बँकेला करावा लागेल. यामध्ये 2 लाख 41 हजार 431 रुपये व्याज भरावं लागेल. तर मासिक हप्याची रक्कम 10 हजार 323 रुपेय इतकी असेल.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.