नागपुरात ‘ऑपरेशन वॉशआऊट’; गुन्हेगारांची खैर नाही

Share This News

नागपूर : अनेक गुन्हेगार नागपुरात अल्पवयीनांच्या टोळ्या चालवित आहे. या मुलांच्या मदतीने गुन्हे घडविण्यात येत आहेत. अशा गुन्हेगारांनी यादी तयार करण्यात आली आहे. आता प्रत्येकाला बिळातून बाहेर काढून कारवाई करण्यात येईल, त्यासाठी उपराजधानीत ‘ऑपरेशन वॉशआऊट’ हाती घेण्यात आल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी नागपूर पोलिस व्यूहरचना करीत आहे. यासाठी गेल्या २० वर्षांपासून गुन्हेगारी जगतात सक्रिय व्यक्तींची यादी तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत दीड हजारावर गुन्हेगार कारागृहाच्या सळाखींमागे पाठविण्यात आले आहेत. आठशेवर गुन्हेगार नागपुरातून पळाले आहेत. त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनच्या निरीक्षकांना व सहकारी अधिकाऱ्यांना गुन्हेगारांच्या झाडाझडतीचे ‘टार्गेट’ ठरवून देण्यात आले आहे. काही गुन्हेगार टोळ्या चालवित आहेत. त्यांच्याविरूद्ध मकोकाअंतर्गत कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मार्चअखेर एकाच वेळी अनेक टोळ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरात गस्त घालणाऱ्या ‘बीट मार्शल्स’साठी १२० नवीन वाहने आली आहेत. त्यांना नवा गणवेशही देण्यात येणार आहे. अनेक ‘बीट मार्शल्स’ला प्रशिक्षणही देण्यात येत आहे. घटनास्थळावर तत्काळ पोहोचण्याचा कालावधी कमी करण्यात येत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.