साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांच्या रूपाने वैज्ञानिक सहीत्यिकाला संधी

Share This News

नारळीकर यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पाहिल्यांदाच जयंत नारळीकर यांच्या रूपाने वैज्ञानिक सहीत्यिकाला संधी मिळणार आहे. शेवटच्या क्षणी जयंत नारळीकर आणि भारत सासणे यांच्यात अध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू होती. मात्र साहित्य मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या चार तास चालल्या बैठकीत नारळीकरांच्या नावावर एक मत झाले. आगामी साहित्य संमेलन 26 ते 28 मार्च दरम्यान नाशिक येथे होणार असल्याच निश्चित झालं आहे 
 जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांची खगोल भौतिक शास्त्रज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध लेखक म्हणून ख्याती आहे. केम्ब्रिज विद्यापीठ टाटा मूलभूत संशोधन संस्था ही त्यांच्यी कार्यसंस्था आहे (Jayant Naralikar selected as president of 94th akhil bharatiya marathi sahitya sammelan).

नारळीकर यांची गाजलेली पुस्तके :

1) अंतराळातील भस्मासुर
2) अंतराळ आणि विज्ञान
3) गणितातील गमती जमती
4) यशाची देणगी
5) चार नगरातील माझे विश्व

जयंत नारळीकर यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार

1) 1965 साली पद्मभूषण
2) 2004 साली पद्मविभूषण
3) 2010 साली महाराष्ट्र भूषण
4) अमेरिकेतील फाउंडेशन तर्फे दिला जाणारा साहित्य विषयक जीवन गौरव पुरस्कार


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.