विदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती द्या

Share This News

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या वायरसमुळे आगडोंब झाला आहे. ब्रिटनमध्ये सप्टेंबर महिन्यात हा वायरस आढळून आला होता. हा कोरोनाचा नवा प्रकार आहे. त्या कोरोना विषाणूच्या तुलनेत ७0 टक्के अधिक वेगाने पसरतो. परिणामी, सर्वत्र चिंता वाढल्या आहेत. या दरम्यान, ब्रिटेनवरून अनेक नागरिक हे भारतात विमानाच्या साहाय्याने पोहोचले आहेत. शिवाय, सोमवारी मुंबई येथे रात्री आलेल्या ब्रिटेनच्या विमानात पाच प्रवासी हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे कोरोनाचा हा नवा प्रकार भारतात पोहोचण्याचा धोका आहे. याची दखल घेत नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी या महिन्यात विदेशातून शहरात आलेल्या प्रवाशांची माहिती मागविली आहे.
कोरोनाचा नवा प्रकार, दुसरी लाट आदींची दखल घेत मनपा आयुक्तांनी नागरिकांच्या सुरक्षात्मक हा निर्णय घेतला आहे. निर्णय घेताना आयुक्तांनी विदेशातून आलेल्या नागरिकांनी कुठल्याही प्रकारची माहिती लपवू नये, असे आवाहनदेखील केले आहे. जे प्रवासी विदेशातून आले आहेत. त्यांनी कोविड कंट्रोल रूमचा फोन क्रमांक 0७१२-२५६७0२१ अथवा ई-मेल एडीडीआयएमसी सर्व्हिसेस जीओवी डॉट या यावर माहिती द्यावी. जागरूक नागरिक विदेशी ट्रॅव्हल एजन्ट, फॉरेन करंसी एक्सचेंजसोबत संबंधित विदेशातून परतलेल्या नागरिकांची माहिती देऊ शकतात. संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांतून येणार्‍या प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन बंधनकारक आहे. त्यांची कोरोनाची चाचणी केली जाईल. त्यांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांच्यावर दिली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.