निम्न पेढी प्रकल्पाच्या कामाला वेग देण्याचे आदेश

Share This News

अमरावती : निम्न पेढी प्रकल्प अमरावती व अकोला जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील ३९ गाव, अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातीह ६ गावांतील सुमारे १२ हजार २३० हेक्टर जमिनीवर शाश्वत सिंचनाची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे या कामाला तातडीने वेग देण्याचे आदेश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले. कडू यांनी प्रकल्पाच्या कामाची नुकतीच पाहणी केली.
पेढी प्रकल्पाचे मुख्य अभियंता आ. तु. देवगडे, कार्यकारी अभियंता वि. भ. बागुल, उपविभागीय अभियंता ध. नि. नखाते, अ. रा. भुते आदी यावेळी उपस्थित होते. प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या लाभ क्षेत्रात दाबयुक्त बंदिस्त वितरण प्रणालीव्दारे पाणी वाहून नेले जाणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून एकूण ४५ गावांना सुमारे साडेबारा हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा निर्माण होणार आहे. पाणी वाहून नेणारे पाइप जमिनीखाली टाकण्याचे प्रस्तावित असल्याचे क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. पाइप जमिनीखालून टाकण्याच्या कामासाठी आवश्यक असलेली जमीन काही कालावधीसाठी संबंधित शेतकऱ्यांनी उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन कडू यांनी यावेळी केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.