चंद्रपुरात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, आमदार संजय रायमूलकर किरकोळ जखमी
पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संजय रायमूलकर हे ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटात किरकोळ जखमी झाले आहेत. तीन दिवसांच्या चंद्रपूर दौऱ्यावर ही समिती आहे. आज ग्रामीण भागात दौऱ्यावर असताना आक्सापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करायला रायमूलकर गेले असताना सिलेंडरचा नॉब फिरवताना अचानक ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. यात त्यांच्या बोटाला किरकोळ जखम झाल्याचं सांगण्यात येत आहे.