पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण

Share This News

इस्लामाबाद, २० मार्च : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवा, नियम आणि समन्वय विभागासाठी इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक म्हणून काम करणारे फैजल सुल्तान यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वीच चीनची कोरोनाची लस टोचून घेतली होती. मात्र, त्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर इम्रान खान यांनी स्वत:ला आयसोलेटेड करून घेतले आहे. तसेच संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.