मुलांना शाळेत पाठविण्यास पालक अनुत्सुक

Share This News

शाळांचे निर्जंतुकीकरण; थर्मल गणचे वाटप
कोरोनाचा प्रकोप अद्यापही कायमच आहे. त्यातच आता शाळाही सुरू होत आहे. हे सर्व लक्षात घेता जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागामध्ये सुरू होत असलेल्या शाळांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण केले आहेच, याशिवाय प्रत्येक शाळेला विद्यार्थी, शिक्षक, कर्मचार्‍यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गण, सॅनिटायझर, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भित्तीपत्रके आदी वितरित करण्यात आली आहेत. सकाळी १0 वाजतापासून शाळांचे वर्ग भरणार आहेत. यामध्ये शाळेमध्ये सुरुवातीला होणारी प्रार्थनादेखील होणार नसल्याचे सांगण्यात येते. कुठलेही सामूहिक कार्यक्रम शाळेत घेता येणार नाही. अध्र्या तासाच्या फरकाने प्रत्येक वर्ग भरणार असून, तीन ते चार तासांचीच शाळा राहणार असल्याची माहिती आहे.लोकशाही वार्ता / नागपूर
कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या १६ मार्च २0२0 पासून बंद असलेल्या शाळा आता उद्या सोमवार, १४ डिसेंबरपासून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये उघडणार आहेत. परंतु शाळेमध्ये आपल्या पाल्याला पाठविण्यासाठी १ लाख ३0 हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ २४ हजार ३३८ विद्यार्थ्यांच्याच पालकांनी लेखी संमती दर्शविली असून, निम्म्याहून अधिक पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास संमती पत्र न देता एकप्रकारे शाळेत पाठविण्यास नकारच दर्शविला आहे.
नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये इयत्ता ९ ते १२ च्या ६५७ शाळा असून, येथे १ लाख ३0 हजार ४५४ विद्यार्थी शिक्षण घेतात. तर ९ हजार १४७ वर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी येथे कार्यरत आहेत. शासनाने यापूर्वी २६ नोव्हेंबर २0२0 पासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. तेव्हाही कोरोना चाचणी करण्याचे शिक्षकांना सांगितले. त्यावेळी जिल्ह्यातील शंभरवर शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी १४ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ९ डिसेंबरला शिक्षण विभागाने पुन्हा शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोरोना चाचणी करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार ३८ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या शिक्षकांनी कोरोनामुक्त होईस्तोर शाळेत येऊ नये अशा सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. याशिवाय शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतर ठेवणे, स्वच्छता राखणे, शाळेचे वेळापत्रक व इतर सर्व सूचना शिक्षण विभागाकडून यापूर्वी दिल्या होत्याच. परंतु उद्या शाळा सुरू होत असल्याने आज रविवारला पुन्हा वेबिनारच्या माध्यमातून माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी आढावा घेऊन सूचनाही केल्या आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.