मालमत्तेसह पाणी बिलावरील शास्तीही होणार माफ

Share This News

मालमत्ता करसंदर्भातील अभय योजनेप्रमाणेच थकीत पाणी बिल संदर्भातही मनपातर्फे योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेनुसार पाणी बिलावरीलही शास्ती माफ केली जाईल, अशी माहिती मनपाचे स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापलिकेतील आयुक्त सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत कार्यकारी महापौर मनीषा कोठे, सत्तापक्षनेते संदीप जाधव, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, कर समिती सभापती महेंद्र धनविजय, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, प्रभारी उपायुक्त मिलींद मेर्शाम, अधीक्षक अभियंता श्‍वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर उपस्थित होते. यावेळी महापौर संदीप जोशी हे व्हीसीच्या माध्यमातून जुळले होते. मालमत्ताकर व पाणीपट्टी हे महापालिकेचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत आहे. कोविड-१९ या जागतिक महामारीच्या काळामध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर नागरिकांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच नागरिकांसाठी मनपाही दिलासादायक पुढाकार घेत आहे. करासंबंधी अभय योजना लागू करून मनपा प्रशासनाद्वारे त्याची प्रचिती देण्यात आली. वन टाईम सेटलमेंट हीच योजना पाणी बिलसंदर्भात लागू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे देण्यात आला होता. मनपा अर्थसंकल्पामध्येसुद्धा याला समाविष्ट करण्यात आले होते. त्यावर प्रशासनामार्फत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. त्यानुसार येत्या २१ डिसेंबर २0२0 पासून पाणी बिलसंदर्भात ‘अभय योजना’ लागू केली जाईल. २२ फेब्रुवारी, २0२१ पर्यंत म्हणजे दोन महिने या योजनेचा लाभ नागरिकांना घेता येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.