मृत्यूनंतर लोक लक्षात ठेवतील की विसरतील, लोकांवर विश्वास नसल्यानं जिवंतपणी स्टेडियमला नाव: प्रकाश आंबेडकर | People will remember or forget after death.

Share This News

देशाला काय नेता मिळाला आहे, लोक विसरुन जातील, अशी त्यांना भीती आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली असून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. (VBA Chief Prakash Ambedkar slams PM Narendra Modi over changing name of Motera stadium)

प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव दिल्यावरुन राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका करताना देशाला काय नेता मिळाला आहे? लोक विसरुन जातील याची त्यांना भीती वाटत आहे. यांच्या मृत्यूनंतर लोक लक्षात ठेवतील की विसरतील याची चिंता आहे. यामुळे त्यांनी मृत्यूपूर्वीच स्टेडियमला नावं दिलेय, अशी टीका आंबेडकरांनी मोदींवर केली आहे.

प्रकाश आंबेडकरांचे ट्विट

क्या नेता मिला है देश को। इनको चिंता है कहीं लोग इन्हें भूल न जाए। इन्हें लोगों पर भरोसा नही है कि गुजर जाने के बाद कोई इन्हे याद रखेगा या नही। इसीलिए मरने से पहले स्टेडियम अपने नाम पर करा लिया#MoteraCricketStadium

राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

खरं किती चांगल्या प्रकारे बाहेर येते: राहुल गांधी
खरं किती चांगल्या प्रकारे बाहेर येते, नरेंद्र मोदी स्टेडियम, अडानी एंड, रिलायन्स एंड, जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली, असं ट्विट करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

सच कितनी खूबी से सामने आता है।

नरेंद्र मोदी स्टेडियम
– अडानी एंड
– रिलायंस एंड

जय शाह की अध्यक्षता में!#HumDoHumareDo

— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 24, 2021

मोदीजी लवकरच त्यांच्यासारखे माजी पंतप्रधान होण्याची चिन्हे: भूपेश बघल

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघल यांनीसुद्धा मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. ही भाजपची परंपरा आहे. अटलजी जिवंत होते, तेव्हा अटल चौक हे त्यांच्या नावावर होते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदावरून पायउतार झाले आणि छत्तीसगडमध्ये अटल चौक नामकरण करण्यात आले. मोदीजी लवकरच त्यांच्यासारखे माजी पंतप्रधान होण्याची चिन्हे आहेत, अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघल यांनी केलीय.

जितेंद्र आव्हाड यांना भाजपचं प्रत्युत्तर

अहमदाबादमधील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना थेट हिटलरशी केली आहे. “हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वत:चं नाव दिलं होतं”, असा टोला आव्हाडांनी मोदींना लगावला आहे. तर, सुधीर मुनंगटीवार यांनी आव्हाड यांना प्रत्युत्तर देताना, यांची स्मरणशक्ती 24 तासाच्या वरती राहत नाही, नाव देण्याचा निर्णय गुजरात क्रिकेट असोसिएशननं केला. नरेंद्र मोदींनी केलेला नाही, असं म्हटलं.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.