मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात याचिका Petition against Minister Vijay Vadettiwar

Share This News

नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.


नेहा मितेश भांगडिया यांच्यासहित सात जणांनी ही याचिका खंडपीठात दाखल केली आहे. नेहा यांच्यासह सात जणांनी वडेट्टीवार यांच्या विरोधात फसवणुकीचे आरोप केले आहेत. याचिकाकर्त्या नेहा भांगडिया या गडचिरोलीतील सेमाना विद्या वनविकास प्रशिक्षण मंडळाच्या सदस्य आहेत. संबंधित संस्थेच्या विश्वस्त पदावरून हटविण्यात आल्याचा आरोप त्यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह ११ जणांवर केला आहे. यासाठी वापरण्यात आलेल्या आपल्या नावाच्या राजीनाम्यावर असलेल्या सह्या खोट्या असल्याचे त्यांनी याचिकेत नमूद केले आहे. त्यानुसार त्यांन वडेट्टीवार यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. नेहा भांगडिया व अन्य सात जणांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. श्रीरंग भांडारकर व अॅड. मनीष शुक्ला यांनी न्यायालयात बाजू मांडली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.