पेट्रोलपंप आता सायंकाळी ७ पर्यंतच

Share This News

नागपूर
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शहरातील स्थिती तर भयावह आहे. त्यामुळे आता शहरातील पेट्रोलपंप सकाळी ७ ते सायंकाळी ७ पयर्ंत सुरू ठेवण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने घेतला आहे.
कोरोनाचा प्रकोप थांबविण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले आहे. त्यात आता जीवनावयक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळात सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे रस्त्यांवरील गर्दी कमी झाली आहे. त्याचा पेट्रोलच्या विक्रीवरही परिणाम झाला आहे. पेट्रोल पंपावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. ग्राहकांशी थेट संपर्क येत असल्याने पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी धास्तीत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपचालकांनी वेळ निर्धारित करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात पेट्रोलपंप या वेळेत सुरू राहतील. आपतकालीन वाहतूक सेवांसाठी तेल कंपन्यांतर्फे संचालित पंप सुरू राहतील. नागपुरात जवळपास ८५ पेट्रोलपंप असून तेल कंपन्या आणि पोलिस प्रशासनातर्फे संचालित १0 पेट्रोलपंप आहेत. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलची सरासरी विक्री ६५ टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती आहे. प्रत्येक पंपावर सरासरी विक्री आता ६५00 लिटरवरून सरासरी २५00 लिटरपयर्ंत कमी झाली आहे.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.