पेट्रोलने गाठला तीन आकडी दर

Share This News

नागपूर
आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच नोंद व्हावी असा तीन आकडी दर पेट्रोलने गाठला आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमचे प्रीमियम प्रॉडक्ट असलेले पॉवर पेट्रोल आज, गुरुवारी प्रतिलिटर १००.२५ रुपयांवर पोहचले आहे.

साधरणपने मागील दीड महिन्यापासून सर्व प्रकारच्या पेट्रोलचे दर वाढत आहेत. यामध्ये पॉवर या पेट्रोलने आज शंभरी गाठली आहे. त्या खालोखाल भारत पेट्रोलियमच्या स्पीड आणि इंडियन ऑइलच्या एक्स्ट्राप्रीमियमचा दर आहे. साधे पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोलमध्ये साधारणपणे अडीच तीन रुपयांचे अंतर दिसून येत आहे. साध्या पेट्रोलचा दर बुधवारी ९६.४९ रुपये नोंदविण्यात आला होता. गुरुवारी यामध्ये ३२ पैशांनी वाढ झाली. ज्यामुळे पॉवर पेट्रोल ९९.९३ रुपयांवरून १००.२५ रुपयांवर पोहचले. तर साधे पेट्रोल ९६.८३ आणि डिझेल ९१.११ रुपयांवर गेले.
या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील जुन्या पेट्रोल पंपवर तीन अंकी दर डिजिटली दिसण्यात तांत्रिक घोळ निर्माण होण्याची शक्यता आहे. नवीन मशीन असलेल्या पेट्रोल पंपवर ही समस्या येणार नाही, अशी माहिती पेट्रोलियम डीलर्सनी दिली.

साधे पेट्रोल : ९६.८३
पॉवर : १००.२५
डिझेल : ९१.११

सर्व प्रकारच्या पेट्रोलमध्ये 32 पैशांची वाढ.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.