नागपुरातील पारडीत उड्डाणपुलाचा पीलर कोसळला

Share This News

नागपूर : पारडी मार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचा पीलर कोसळल्याची घटना बुधवार, २४ फेब्रुवारीला दुपारी घडली. घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यामार्फत पारडी मार्गावर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या पुलाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. पुलाच्या पीलरच्या उभारणीसाठी लोखंडी सळाखीचा पिंजरा उभारण्यात आला होता. बुधवारी दुपारच्या सुमारास हा पीलर अचानक कोसळला. घटनेनंतर एनएचएआयचे पथक तातडीने पारडी परिसरात दाखल झाले. पीलर सरळ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. पारडी प्रकल्पाचे काम २०१६ मध्ये सुरू झाल्यानंतर प्रथमच येथे हा प्रकार घडला आहे. नागपुरात मेट्रोचे काम सुरू असतानाही काही ठिकाणी असे पीलर कोसळले होते. पारडी येथे घडलेल्या प्रकारानंतर याभागातील वाहतूक अन्य मार्गांवरून वळविण्यात आली आहे. घटनेत कुणाला इजा झाली किंवा कसे याबाबत अधिकृत माहिती एनएचएआयने जारी केली नव्हती.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.