केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केले मतदान

Share This News

कण्णुर, 

जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत होत असलेल्या केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत  केरळचे मुख्यमंत्री पिनरायी  विजयन यांनी  सोमवारी कण्णुरच्या पिनरायी परिसरातील मतदान केंद्रास भेट दिली आणि मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करीत  मतदान केले. तीन टप्प्याच्या मतदानानंतर 16 डिसेंबरला मतमोजणी घेण्यात आली आहे. 

केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  तिरंगी निवडणुकीत मुख्य लढत सताधारी एलडीएफ, कॉंग्रेस प्रणीत युडीएफ आणि भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहे.विशेष म्हणजे 2021 साली केरळमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुका सुरु असताना केरळच्या नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याच्या घोषणेने मुख्यमंत्री पिनरायी  विजयन यांच्यावर टीका होत असून आदर्श निवडणूक आचारसंहितेचा उल्लंघ केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भाजपला केरळमध्ये फारसे यश प्राप्त झाले नाही. सध्या भाजपचे ओ राजगोपाल हे एकमेव आमदार आहेत तर केंद्र सरकारमध्ये व्ही मुरलीधरन परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कामकाज मंत्री आहेत  


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.