नियोजन काहीसे चुकलेच : वडेट्टीवार

Share This News

नागपूर : राज्याकडे आहेत त्या साधनांच्या आधारे परिस्थितीवर मात करण्याचे प्रयत्न आहेत. नागपूर जिल्ह्याला अतिरिक्त ६५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. अधिक निधी लागला तरी आम्ही देऊ नियोजन काहीसे चुकलेच, रुग्ण मोठ्या संख्येने निघतील असे वाटले नव्हते, असे विधान राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी नागपूरसह राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर झाल्याचे ते म्हणाले. नागपुरातील रुग्णवाढ चिंतेची असल्याचे त्यांनी नमूद केले. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. २५ वर्षांच्या आतील तरुणांना संसर्ग होत आहे. इतकेच नाही तर लहान मुलांनाही कोरोना होत असल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले. रुग्णवाढ होत असताना थोडीशी दिलासादायक बाब म्हणजे ८० टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत, असे त्यांनी नमूद केले.कोरोनाचे दररोज ३५ ते ४० हजार रुग्ण वाढत आहेत, ही चिंताजनक बाब आहे, असे ते म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.