ताडोबा-बफर क्षेत्रातील पर्यटन रस्त्यावरील प्लास्टिक स्वच्छता अभियान
जगविख्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकरिता चंद्रपूरहून जाणारा पद्मापूर ते मोहर्ली या जंगल रस्त्यावरील प्लास्टिक संकलन करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रविवार सकाळी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष व जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे व त्यांची इको-प्रो सदस्य आणि मोहर्ली वनपरिक्षेत्रचे आरएफओ राघवेंद्र मून आणि त्यांचे कर्मचार्यांनी दोन चमू करून एक पद्मापूर ते आगरझरी तर दुसरी चमू मोहर्ली ते आगरझरी असा पायदळ प्रवास करीत रस्ताच्या दुतर्फा पर्यटक, नागरिकांकडून फेकण्यात आलेले खाद्यपदार्थांचे प्लास्टिक वेष्टन, खर्रा प्लास्टिक, पाणी बॉटल, मास्क आदी संकलन करीत रस्ता प्लस्टिक मुक्त करण्यात आला.
बफरचे प्रवेशद्वार ते कोरचे प्रवेशद्वार असा १६ किमीचा प्रवास पायी चालत स्वयंसेवक व वनकर्मचारी यांनी रोडलगत येणारे वन्यप्राण्यांना कोणताही धोका होऊ नये म्हणून प्लास्टिक संकलन करीत, जनजागृती करण्याच्या प्रयत्न करण्यात आला. ताडोबामध्ये येणारे पर्यटक व या मार्गाने जाणारे स्थानिक नागरिक, आगरझरी बटरफ्लाय गार्डनला येणारे पर्यटक आपल्यासोबत आणलेले खाद्य पदार्थाचे प्लास्टिक फेकून देतात. तसेच स्थानिक आणि मजूर वर्ग मोठय़ा प्रमाणात खर्रा खाऊन प्लास्टिक पन्नी फेकल्याने सर्वत्र विखुरलेल्या अवस्थेत होते. या प्लास्टिकमुळे प्रदूषणासोबत वन्यप्राण्यांना धोका होणाची शक्यता असते.
राबविण्यात आलेल्या या उपक्रमात मोहर्ली वनपरिक्षेत्राचे आरएफओ राघवेंद्र मून, वनपाल भूषण गजापुरे, केबी देऊरकर, एडी मलेवार, वनरक्षक एचबी भट, ए.एन. ताजने, धनविजय, जिडी केजकर, कर्मचारी साखरकर, दुपारे, मांदाळे, शेडमाके, कानडे, रामटेके, गाऊत्रे, जेंगठे, येडमे, चिकराम तर इको-प्रोचे धर्मेंद्र लुनावत, बिमल शहा, अभय अमृतकर, अमोल उत्तलवार, आकाश घोडमारे, जयेश बैनलवार, सुनील पाटील, सुधीर देव, राजू काहीलकर, कपिल चौधरी, सचिन धोतरे, मनीष गावंडे, राजेश व्यास, सुमित कोहळे, हरीश मेर्शाम, वैभव मडावी, आशिष मस्के, मनीषा जैस्वाल, प्रगती माकर्ंडवार, सचिन भांदककर आदी सहभागी झाले होते.