शहरी बेघरांना 2022 पर्यंत मिळणार पक्की घरे

Share This News

नवी दिल्ली, 01 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत देशातील बेघरांना पक्की घरे उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंतप्रधानांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लाइट हाउस प्रोजेक्टचे उद्घाटन केले. नव्या वर्षात पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेली ही पहिली योजना आहे. कधीकाळी देशात निवास योजना हा सरकारसाठी प्राधान्याचा विषय नव्हता. मात्र, आता निवास योजना एखाद्या स्टार्टअप प्रमाणे काम करतील, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले केंद्र सरकारच्या लाईट हाऊस प्रोजेक्टसाठी त्रिपुरा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तमिलनाडू, आंध्र प्रदेश, झारखंड आणि गुजरात या राज्यांची निवड करण्यात आली आहे. हा केंद्रीय शहर मंत्रालयाचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये स्थानिक जलवायू आणि पर्यावरणाचे संरक्षण करून पक्की घरे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी खास तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. घरांसाठीचे बीम कॉलम आणि पॅनल कारखान्यातून थेट घर बांधायच्या ठिकाणी आणले जातील. त्यामुळे घरबांधणीसाठी लागणाऱ्या खर्चात मोठी कपात होईल. तसेच ही घरे भूकंपरोधी असतील.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.