कृषीसुधार कायद्यावरील माहिती पुस्तिका जरूर वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Share This News

कृषीसुधार  कायद्यावर सुरु असलेल्या शेतकरी  आंदोलनाच्या  पार्श्वभूमीवर  तसेच केंद्र सरकारने  प्रकाशित केलेल्या माहिती पुस्तिकेवर  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना विशेष आवाहन केले.  ट्वीटर द्वारे आपले विचार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “  कृषी सुधारणा कशाप्रकारे आपल्या शेतक-यांची  मदत करणार आहेत  याबाबत माहिती देणा-या पुस्तिकेत चित्र आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून बराच मजकूर सविस्तरपणे उपलब्ध आहे. हे पुस्तक नमो अप्लिकेशनवर http://nm4.in/dnldapp उपलब्ध आहे. वाचा आणि मोठ्या प्रमाणात प्रसारित करा. ” काही दिवसांपूर्वी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी वर्गास खुले पत्र लिहिती केंद्र सरकारची भूमिका सविस्तरपणे मांडली होती.

शेतकरी  आंदोलनाच्या  पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गास योग्य आणि खरी माहिती   तसेच विरोधीपक्षांकडून होत असलेल्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने कृषी सुधारणा  कायद्याबाबत माहिती देणारी एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.  ‘पुटींग फार्मर्स फस्ट ’ असे पुस्तिकेचे नाव आहे. प्रेस इन्फोर्मेशन ब्यूरो- पीआयबीच्या  संकेत स्थळावर ही पुस्तिका  उपलब्ध आहे. 106  पानांची ही पुस्तिका इंग्रजी भाषेत असून कृषीसुधार  कायद्याचे फायदे, भ्रम आणि खरी परिस्थिती आणि एकंदर स्वरूप यांचे वर्णन अगदी सोप्या शब्दात सचित्र केले आहे.  केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही  पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.