विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करणा-या मुलींना सलाम : पंतप्रधान नरेंद्र मोदी
राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना उद्देशून विशेष संदेश दिला. ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करणा-या देशाच्या मुलींना सलाम. केंद्र सरकारने कन्या सबलीकरण कार्यासाठी अनेक उपक्रम सुरु केले ज्यात उत्तम शिक्षण आणि आरोग्य सेवांच्या उप्लब्धतेसह कन्यांच्या विषयी संवेदनशीलता निर्माण झाली. आजचा दिवस कन्या सबलीकरण कार्यासाठी समर्पित सगळ्यांच्या कार्याची नोंद घेत कौतुक करण्याचा आहे ज्यामुळे बालिकांना संधी आणि एक सन्मान जनक जीवन प्राप्त झाले आहे. “