पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार कोरोना लसीकरणावर मुख्यमंत्र्याशी संवाद

Share This News

नवी दिल्ली,  11 जानेवारी :प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत 16 जानेवारीपासून सुरु होणा-या राष्ट्रव्यापी कोरोना लसीकरण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी  सोमवारी मुख्यमंत्र्याशी दृक-श्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधणार आहे तसेच   संबंधीत राज्यातील कोरोना परिस्थिती आणि आरोग्य व्यवस्थांचा आढावा घेणार आहेत. प्रत्तेक राज्यात कोरोनाची स्थिती,  कोरोना  लसीकरण, आरोग्य यंत्रणा आणि राज्यातील एकूण  स्थिती तसेच घ्यावयाचे उपाय यावर चर्चा आणि मंथन यावेळी होणार आहे.

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली देशभरातील कोरोनाच्या सद्यस्थितीबरोबरच लसीकरणाबाबत राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.3 जानेवारी रविवारला भारताच्या औषध नियंत्रक महासंचालायाने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या  दोन  स्वदेशी लसींना  अत्यावश्यक आणि आपतकालीन परिस्थितीत  सीमित वापरासाठी मंजुरी दिली. भारताच्या औषध नियंत्रक महासंचालायाने सीरम इंस्टीट्यू ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोरोना लसीस मान्यता दिली असून  16 जानेवारी पासून देशभरात कोरोनासाठी लसीकरण मोहीमेला प्रारंभ होईल.

आरोग्य कर्मचा-यांना आणि प्रत्यक्ष आघाडीवर कार्यरत असणा-या कोरोना योध्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे, साधारणपणे ही संख्या 3 कोटी आहे. त्या खालोखाल 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षाखालील काही इतर आजार असलेल्या व्यक्तींना  लसीकरण केले जाईल. ही संख्या अंदाजे 27 कोटी आहे. कोरोना संकटात आणि देशव्यापी संचारबंदीत शिथिल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा  उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल आणि कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढील योजना आखण्याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.    


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.