हरिद्वारमधील कुंभमेळ्याची सांगता करण्याचे पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

Share This News

नवी दिल्लीः देशात कोरोनाचे गंभीर बनलेले संकट आणि हरिद्वारमधील कुंभमेळ्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्याची सांगता करून कुभमेळावा प्रतिकात्मक ठेवण्याचे आवाहन साधूसंतांना केले आहे.
उत्तराखंडमध्ये हरिद्वार येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून अनेक आखाड्यांच्या साधू-संतांना संसर्ग झाला आहे. एका आखाड्याने तर कुंभमेळ्याची समाप्ती करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून त्यांना कुंभमेळ्याची सांगता करण्याची विनंती केली. सर्व संत, महंतांच्या आरोग्याची माहिती घेताना पंतप्रधान मोदी यांनी कुंभमेळ्याची सांगता झाल्यास कोरोनाविरुद्धच्या लढ्यास बळ मिळेल, असे आवाहन केले. पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनाला साधु संतांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आता लक्ष लागले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.