रेल्वे रूळांवरून पाठलाग करत पोलिसांनी पकडला चोर Police caught the thief while chasing him on the railway tracks

Share This News

नागपूर : रेल्वेत मोबाइल चोरणाऱ्याला पकडण्यासाठी लोहमार्ग पोलिसाने रूळांवरून पळत एकाला सिनेस्टाइल अटक केली. कोलकाता मार्गावर सोमवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. तौफिक शेख (वय ३०) हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस शिपाई योगेश घुरडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
गेल्या आठवड्यात नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमधून एका टोळीने प्रवाशांचे मोबाइल लांबवित गाडीतून उड्या घेऊन पलायन केले होते. त्यानंतर दोनच दिवसांत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तौफिक हा या टोळीचा मुख्य आहे. कोलकाता आणि मुंबई रेल्वे मार्गावरील आउटरवर गाडीचा वेग कमी असतो. यावेळी अनेक प्रवासी मोबाइलवर कुटुंबीयांशी संवाद साधत असतात. ही संधी साधत टोळीतील सदस्य प्रवाशांचे मोबाइल हिसकावतात व गाडीतून उड्या मारून पसार होतात. नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमध्येही असाच प्रकार घडला आहे. या गंभीर घटनेची दखल पोलिस निरीक्षक सतीश जगदाळे यांनी टोळीचा शोध सुरू केला. या टोळीतील आरोपीने मोबाईल मोमिनपुऱ्यात विकले. विकणाऱ्याला आणि खरेदी करणाऱ्यांनाही पोलिसांनी यापूर्वी अटक केली. मात्र तौफिक हा फरार होता. तो पुन्हा रेल्वे गाडीत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस शिपाई योगेश घुरडे, शैलेश उके, पप्पु मिश्रा, प्रवीण खवसे, चंद्रशेखर मदनकर आणि रोशन मोगरे यांनी कोलकाता मार्गाकडे मोर्चा वळविला. पोलिसांना पाहताच आरोपी पळाले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप गोंडाणे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.