गोंदिया आंबाटोला जंगलात पोलिसांची नक्षलवाद्यांशी चकमक

Share This News

गोंदिया : सालेकसा तालुक्यात घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या नक्षलवाद्यांसोबत आज, रविवारी पोलिसांची चकमक झाली. तथापि, पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पळून गेले. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.
सालेकसा तालुक्यातील हाजराफाल, कोपालगड, मरामजोब, महामाया पहाडी टॉवर लाइन भागांत घातपात करण्याच्या उद्देशाने नक्षलवादी फिरत असल्याची गुप्त माहिती रविवारी सकाळी सालेकसाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले व पथकाला मिळाली.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे व अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, नवेगावबांध येथील पथक, बीडीडीएस पथक यांच्याकडून आंबाटोला जंगलात शोध अभियान राबविण्यात आले. सकाळी आठच्या सुमारास 18 ते 20 नक्षलवादी येताना दिसले. पोलिसांनी त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. परंतु, सशस्त्र नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनीदेखील प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी पळून गेले. रात्री उशिरापर्यंत आंबाटोला जंगलात शोध अभियान सुरू होते. दरेकसा दलम व प्लाटून -55 नक्षलवाद्यांवर सालेकसा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.