नागपुरात युवतीचे अश्लील व्हिडीओ काढले, तरुणाला अटक |Pornographic video of a young woman taken out in Nagpur, a young man arrested

Share This News

नागपूर : पोलिसांत नोकरीचे मिळवून देण्याचे आमिष दाखवित २० वर्षीय तरुणीला अश्लील व्हिडीओ व छायाचित्र काढायला लावले. त्यानंतर ते व्हॉट्सअॅपवर मागविणाऱ्या काटोलच्या तरुणाला हिंगणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अरुण ज्ञानेश्वर येनूरकर हे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी महाल भागात राहते. पोलिसात भरती होण्यासाठी ती रेशीमबाग मैदानावर सराव करते. अरुणही तेथे सराव करायचा. त्याने तरुणीसोबत ओळख वाढविली. पोलिस दलातील बड्या अधिकाऱ्यांसोबत ओळख असल्याचे त्याने सांगितले. तिला पोलिसांत नोकरीचे आमिष दाखविले. अरुणनेला नग्नावस्थेतील व्हिडीओ व छायाचित्र काढायला लावले. ते व्हॉट्सअॅपवर पाठवायला लावले. अशात अरुणने तरुणीच्या वडिलांशीही संपर्क साधला. मुलीला नोकरी लावून देण्यासाठी त्याने त्यांच्याकडून ४ लाख रुपये घेतले. तरुणीच्या वडिलांनी नातेवाइकांकडून पैसे उधार घेऊन अरुणला दिले. पैसे घेतल्यानंतरही अरुणने तरुणीला नोकरी लावून दिली नाही. तरुणीच्या वडिलांनी पैसे परत मागितले. त्याने नकार दिला. २० फेब्रुवारीला तरुणीच्या वडिलांनी हिंगणा परिसरात विष घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान अरुणने पैसे देण्यास नकार दिल्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी अरुणविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. अरुणला सोमवारी अटक करण्यात आली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.