नागपुरात बालिकेला दाखविले अश्लील व्हिडीओ

Share This News

नागपूर : शेजारी राहणाऱ्या दहा वर्षीय बालिकेला अश्लील व्हिडीओ दाखविणाऱ्या विरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शेख हे आरोपीचे नाव आहे. तो ४२ वर्षांचा आहे. (पीडितेची ओळख पटू नये म्हणून आरोपीचे ही नाव उघड केलेलं नाही) शेख यांनी त्याच्या शेजारी राहणाऱ्या १० वर्षीय बालिकेला एकटे साधत अश्लील व्हिडीओ दाखविले. यामुळे पीडित मुलगी गेल्या काही दिवसांपासून घाबरत होती. पालकांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित बालिकेच्या पालकांनी अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शेख विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.