जीएसटीविरुद्ध राष्ट्रपतींना देशभरातून जाणार पोस्टकार्ड Postcards will go across the country to the President against GST

Share This News

नागपूर : जीएसटी कायद्याच्या विरोधात व्यापाऱ्यांनी पोस्टकार्ड मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संपूर्ण देशभरातून पत्र पाठविण्यात येणार आहेत.
अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाचे (कॅट) राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी दिली. याप्रसंगी कॅट नागपूरचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर, महामंत्री फारुक अकबानी, उपाध्यक्ष ज्योती अवस्थी, ज्ञानेश्वर रक्षक आदी उपस्थित होते. व्यापारी साडेतीन वर्षांपासून जीएसटीमुळे त्रस्त आहेत. जीएसटी कायदा अधिक किचकट झाला आहे. जीएसटी कायदा साधा राहिलेला नाही. व्यापाऱ्यांना वर्षाकाठी एकच रिटर्न भरावा लागेल, असे सांगण्यात येत होते. मात्र ११ प्रकारचे रिटर्न एकाच महिन्यात भरावे लागत आहेत. संगणाकासमोर बसून ऑनलाइन रिटर्न भरण्यात व्यापाऱ्यांचा वेळ खर्च होत आहे. त्याचा आर्थिक फटकाही व्यापाऱ्यांना बसत आहे. फेक इनव्हाइस नावाखाली प्रामाणिक व्यापाऱ्यांना त्रास देण्यात येत आहे, असे भरतीया म्हणाले. त्यामुळे आता व्यापारी राष्ट्रपतींकडे दाद मागणार आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.