मंत्री विजय वड्डेटिवार यांच्या विरोधात पोस्टर बाजी

Share This News

अनेक वर्षांपासून चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी शासन दरबारी रखडली आहे. स्वातंत्र्याच्या रणसंग्रामामध्ये विशेष भूमिका बजावणारा चिमूर जिल्हा घोषित करावा, अशी मागणी चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती व नागरिकांकडून मागील ४७ वर्षांपासून करण्यात येत आहे.तरी देखील ही मागणी पूर्ण न होत असल्याने या मागणीसाठी कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बडे व इतर राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयावर चिमूरकरांचा मोर्चा धडकला होता. त्यानंतर चिमूर बंददरम्यान शहरातील काही व्यापारी प्रतिष्ठाने, बाजारपेठ बंद होत्या. बंददरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. बंद शांततेत पार पडला.परतू या प्रतिसादला काही उत्तर मिळाले नाही म्हणून याच संदर्भात चंद्रपूर मध्ये पालक मंत्री विजय वड्डेटिवार विरोधात यांच्यापोस्टर बाजी करण्यात आली. चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वड्डेटिवार चिमुर ऐवजी आता ब्रम्हपुरी ला जिल्हा करण्याची मागणी करताहेत. त्यामुळे त्यामुळे पालकमंत्री वड्डेटिवारांच्या या बदलत्या भूमिकेविरोधात चिमुर मध्ये मध्य रात्रीच्या सुमारास अनेक चौकात फलक लावण्यात आले. ” जिथे गेला तिथे जिल्हा,अश्या दिशाभूल करणाऱ्या पालकमंत्र्याला हद्दपार करा, चिमुर क्रांति जिल्हा झालाच पाहिजे” अश्या प्रकारचे फलक चिमुर मधील अनेक चौकात लावण्यात आले.





 

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.