मलकापूरच्या कोविड रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित, व्हेंटिलेटरवरील रुग्णाचा मृत्यू

Share This News

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथील जिल्हा सामान्य शासकीय कोविड रुग्णालयात विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील एका करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विद्युत पुरवठा खंडित होताच उपचार घेणाऱ्या रुग्णांना त्रास सुरू झाला. व्हेंटिलेटर बंद झाल्याच्या १५ मिनिटानंतर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडली.
मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर असून यामध्ये एकूण ३३ कोरोनाबाधित उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्ण ऑक्सिजनवर, १ रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. रात्री ९ वाजून ३० मिनिटाला तांत्रिक अडचणीमुळे मलकापूर शहराचा विद्युत पुरवठा खंडित झाला. यावेळी रुग्णालयातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला. यामुळे ऑक्सिजनवरील रुग्णांचे हाल झाले. शिवाय एका रुग्णाचे व्हेंटिलेटर बंद झाल्याने त्याचा अवघ्या १५ मिनिटातच मृत्यू झाला.
याबाबतची माहिती मलकापूरचे नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनी विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केली व ज्या रुग्णांना त्रास होत होता, त्यांना अन्य रुग्णालयात हलवण्यासाठी मदत केली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.