नागपुरात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी

Share This News

नागपूर, 23 मार्च : नागपुरात मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. सूर्योदयाला नागपूरकरांनी हलका पाऊस आणि आकाश ढगाळलेले अशी सकाळ अनुभवली. ढगाळलेल्या वातावरणामुळे सोमवारी दिवसभराच्या तापमानात गेल्या 24 तासात 3 अंश सेल्सिअसने घट झाली. शहरात 33.3 अंश तापमान नोंदवण्यात आले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व मध्य प्रदेश व आसपासच्या क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम नागपूरसह विदभार्तील अन्य जिल्ह्यावर झाला आहे. त्यामुळे वातावरण ढगाळलेले आहे. वाशिम जिल्ह्यात 15 मिमी, अमरावती येथे 4 तर अकोल्यामध्ये 0.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. नागपुरात येत्या 24 मार्चपर्यंत आकाशात ढग दाटलेले राहतील. काही ठिकाणी हलका पाऊस येण्याची शक्यता आहे. आर्द्रतेचा स्तर सुमारे 70 टक्के राहण्याची शक्यता आहे. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.